nuksan bharpai gr अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. वर नमूद शासन निर्णय, महसूल व वन विभाग, दि.१३.०५.२०१५ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर सन २०१५-२०२० या कालावधीसाठी विहित करण्यात आले होते. nuksan bharpai gr latest
nuksan bharpai yadi माहे जून, २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यातील वादळ व गारपीटीमुळे ३८५६ बाधित शेतकऱ्यांच्या झालेल्या २३९०.०८ हेक्टर शेतीपिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने वर नमूद दि.१३.०५.२०१५ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या दराने द्यावयाच्या मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडून दि.१४.१०.२०२२ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
हा प्रस्ताव मा. मंत्री (मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.०९.११.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आला होता. मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रस्तावास मान्यता दिल्याप्रमाणे शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.
माहे जून, २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यातील वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.३२५.४२ लक्ष (अक्षरी रुपये तीन कोटी पंचवीस लक्ष बेचाळीस हजार फक्त)
इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. २. वर अनुक्रमांक ४ येथे नमूद दि.२४.०१.२०२३ अन्वये सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार कार्यासन म-११ यांनी हा निधी वितरित करावा. जिल्हाधिकारी यांनी वर अनुक्रमांक ४ येथे नमूद दि.२४.०१.२०२३ अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करुन ती जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत संगणकीय प्रणालीवर भरावी. ही माहिती भरतांना –