vayoshri yojana maharashtra 2024 ६५ वर्षे वरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रु महिना मुख्यमंत्री वयोश्री योजना

vayoshri yojana maharashtra 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनाद्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत. आर्थिक मदत ही वृध्द लोकांसाठी उपयुक्त अशी श्रवण यंत्र, फोल्डिंग वॉकर, बॅक सपोर्ट बेल्ट, सर्वाइकल कॉलर, चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेयर, कमोड चेयर निब्रेस आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठांमध्ये वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा निराकरणासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे. तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे, योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन, प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. लाभ वितरण झाल्यावर या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन घ्यावे लागणार आहे. vayoshri yojana maharashtra 2024

mukhyamantri vayoshri yojana apply online अर्ज कसा करायचा ?

वयोश्री योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन योजनेच्या रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करावे. काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे, सर्व माहिती अचूक टाकावी. सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करावे. शेवटी वयोश्री योजनेचा फॉर्म भरून झाल्यावर अर्ज सबमिट करायचा आहे.

vayoshri yojana maharashtra 2024

  • निवड कशी होणार ? महाराष्ट्र मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार ज्या व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे.
  • निकष काय ? या योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. ज्येष्ठ नागरिकाचे वय हे किमान ६५ वर्षे असावे. तसेच या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असणे आवश्यक आहे.

वयोश्री योजना ही महाराष्ट्र सरकारची वृद्धांसाठी असलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा वयस्क असलेल्या, गरीबी रेषेखालील असलेल्या आणि कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेऊ न शकणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत प्रदान केली जाते.

या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा ₹3000/- पेन्सन मिळते. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जावे लागते. अर्ज करताना आधार कार्ड, राशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला (जर असल्यास) यासारख्या कागदपत्रांची आवश्यकता असते.

Leave a Comment