shetkari karj mafi 2024 | 50,000 रु. अनुदान GR आला या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

shetkari karj mafi 2024 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. तथापि, कोल्हापूर जिल्हयातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन

 

योजनेच्या निकषानुसार त्याची विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत मा. लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन, केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता, शासन कार्य नियमावली मधील कलम २९ (१) च्या तरतुदी नुसार उक्त योजनेच्या दि. २९.०७.२०२२ च्या शासन निर्णयातील (1) योजनेचा तपशील (३) यामध्ये नमूद असलेल्या तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याव्दारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

 

(I) योजनेचा तपशील – ३) सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि. ३० जून २०१८ पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि. ३० जून २०१९ पर्यत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दि.३१ ऑगस्ट २०२० पर्यत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ ‘अथवा सन २०१९- २० या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र

Leave a Comment