Dushkal:या जिल्ह्यातील 32 हजार शेतकरी दुष्काळी अनुदानास पात्र 35 कोटी मंजूर दुष्काळ 2024.

दुष्काळ 2024 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील 32 हजार शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानासाठी पात्रतेची माहिती जाणून घेऊया.
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 35 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दुष्काल 2024
महसूल प्रशासनाने १ मार्चपासून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम हाती घेतले असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी दुष्काळी अनुदानाला चालना मिळाली आहे
त्यासाठी 40 हजार 585 हेक्टरवरील 32 हजार 298 टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळाला असून, त्यामुळे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळी अनुदानाची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.
तीन हेक्टरपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल
खरीप हंगाम 2023 च्या दुष्काळासाठी, वाढीव क्षेत्राच्या निर्णयानुसार, 3 हेक्टरपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल, जर यावरील पिकाचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
सोयगाव तालुक्यात दुष्काळात ४० हजार ५८५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल यापूर्वीच शासनाला सादर करण्यात आला आहे.
त्यामुळे तालुक्यात 35 कोटी 81 लाख 38 हजार 200 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

अधिक माहितीसाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment