Ration Card newsरेशन कार्डधारकांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधा घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने घेतला आहे. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे ज्या वस्तू मिळतात. एक किलो रवा, चना डाळ, साखर, एक लिटर तेल, यामध्ये आता एक नवीन वस्तू समाविष्ट करण्यात आली आहे. तेव्हा ती वस्तू कोणती आहे आणि कोणते दिवशी हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.
तर पहा मित्रांनो राज्यात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अंतोदय यांनी योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजी नगर अमरावती विभाग आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील.
दारिद्र्यरेषेवरील केसरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या वस्तू रेशन दुकानात मिळणार आहेत. तसेच यामध्ये मित्रांनो नवीन एक वस्तू कोणती मिळणार आहे. ते पहा दहा किलो किराणा बसेल अशी एक मोठी विणलेली कापडी पिशवी देण्यात येणार आहे.
आणि मित्रांनो ही पिशवी लाभार्थ्यांना वर्षातून दोन वेळा देण्यात येणार आहे. अर्थात दर सहा महिन्यांनी एकदा याप्रमाणे रेशन दुकानात मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बघा राज्यातील सुमारे एक कोटी 69 लाख शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यासाठी 550 कोटी सत्तावन्न लाख इतक्या खर्चात मंजुरी देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो गुढीपाडवा सणा निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.